आमचे वैशिष्ट

 

महत्वाच्या घडामोडी

 • News

  GST Registration Process

  सविस्तर वाचा »

 • News

  फेडररने पाच वर्षांनंतर जिंकले ग्रॅण्डस्लॅम

   स्वित्झर्लंडचा सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने आपला चिरप्रतिस्पर्धी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. फेडररने पाच सेटपर्यंत रंगलेल्या जेतेपदाच्या लढतीत नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय मिळवित चाहत्यांना ‘ड्रीम फायनल’चा थरार दाखविला. ३५ वर्षीय फेडररचे कारकिर्दीतील हे १८वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद होय. तसेच तब्बल पाच वर्षांनंतर रॉजर फेडररने ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करून दाखवलाय.

  अनेक रथी-महारथी टेनिसपटूंच्या धक्कादायक पराभवानंतर १७व्या मानांकित रॉजर फेडरर व ९व्या मानांकित राफेल नदाल या समकालीन महान टेनिसपटूंमधील ‘ड्रीम फायनल’ने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनची सांगता झाली. उभय खेळाडूंच्या तोडीस तोड खेळामुळे टेनिसशौकिनांसाठी ही किताबी लढत आनंदाची पर्वणीच ठरली. फेडररने स्टॅन वावरिंकाचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करून अंतिम फेरी गाठली होती, तर बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवने नदालला विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजविले होते. नोवाक जोकोविच व ऍण्डी मरे या अव्वल मानांकित खेळाडूंचा आधीच पराभव झाल्याने तमाम टेनिसप्रेमींना फेडरर-नदाल यांच्यातील फायनलचे वेध लागले होते. अखेर (29/1/2017) झालेल्या ‘ड्रीम फायनल’मध्ये उभय खेळाडूंनी ताकदवर फोरहॅण्ड, भन्नाट बॅकहॅण्ड आणि जबरदस्त बिनतोड सर्व्हिस असे आक्रमक टेनिस खेळून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

  फेडररने नदालचे सर्व्हिस ब्रेक करून पहिला सेट जिंकला. त्यानंतर नदालने दुसरा सेट जिंकून लढत काटय़ाची होणार असल्याचे संकेत दिले. फेडररने तिसऱया सेटमध्ये अतिशय देखणा खेळ करीत नदालला चूका करण्यास भाग पाडले. मग फेडररने हा सेट ६-१ फरकाने जिंकून लढतीत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, नदालने चौथा सेट जिंकून सामन्यात पुन्हा रंगत निर्माण केली. उभय खेळाडूंच्या चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये नदालने सुरूवातीला आघाडी घेतली. मात्र, फेडररने नंतर ४-३ अशी आघाडी घेतली. मग फेडररने अतिशय शांतपणे खेळ करीत विजयाला गवसणी घातली.
  झोकात पुनरागमन

  २०१२ सालामध्ये विम्बल्डन जिंकणाऱया स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर या दिग्गज खेळाडूने तब्बल पाच वर्षानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मान संपादन केलाय हे विशेष. रॉजर फेडररने पुरुष एकेरीत १८वे ग्रॅण्डस्लॅम जिंकत टेनिसविश्वात झोकात पुनरागमन केले. २०१० सालानंतर त्याला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आले आहे. हे त्याचे पाचवे ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद ठरले. २००७ सालानंतर ग्रॅण्डस्लॅममध्ये राफेल नदालला हरवणाऱया रॉजर फेडररने तब्बल तीन वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाच सेटमध्ये हरवत ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची करामत करुन दाखवलीय. दुखापत व सुमार फॉर्म यामध्ये अडकलेल्या दोन्ही खेळाडूंसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची होती. या स्पर्धेत जबरदस्त खेळ करीत दोघांनी झोकात पुनरागमन केले.

  सानिया मिर्झाला उपविजेतेपद

  स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व इवान डोडिग या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्रच्या दुहेरीत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. ऑबिगेल स्पीयर्स व यॉन सॅबेस्टीयन यांच्याकडून त्या जोडीला हार सहन करावी लागली.

  सविस्तर वाचा »

 • News

  विदर्भाच्या 16 वर्षीय मुलांनी घडविला इतिहास

   29 जानेवारी हा दिवस विदर्भ क्रिकेट संघटनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेला आहे. विदर्भाच्या 16 वर्षांखालील मुलांनी विजय मर्चंट करंडक जिंकून नवा इतिहास घडविला. बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची विदर्भाची ही पहिलीच वेळ होय. विजेत्या विदर्भाला करंडकाशिवाय रोख चार लाखांचा पुरस्कार देण्यात आला. 

  इंदूर येथे (29/1/2017) संपलेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशचा 171 धावांनी धुव्वा उडवून विजेतेपदाला गवसणी घातली. विदर्भाने निर्णायक विजयासाठी उत्तर प्रदेशला 332 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 160 धावांतच आटोपला. 

  5 बाद 64 या धावसंख्येवरून सुरूवात करणाऱ्या उत्तर प्रदेशला विजयासाठी 268 तर, विदर्भाला पाच बळींची आवश्‍यकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे उपहारापूर्वीच उत्तर प्रदेशचे उरलेले पाच गडी बाद करून ऐतिहासिक विजयावर शिक्‍कामोर्तब केले. मध्यमगती गोलंदाज प्रेरित अग्रवालने 59 धावांत सहा गडी बाद करून विजयात निर्णायक भूमिका वठविली. हर्ष दुबेने 38 धावांच्या मोबदल्यात तीन बळी टिपले. 

  विदर्भाने हे विजेतेपद युवा प्रशिक्षक व माजी रणजी कर्णधार रणजित पराडकर यांच्यासाठी मार्गदर्शनाखाली मिळविले, हे उल्लेखनीय. क्रिकेटपटू म्हणून विदर्भ क्रिकेटची दहा वर्षे सेवा केल्यानंतर पराडकर यांनी गतवर्षी 16 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली होती. यापूर्वी विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघाने प्लेट गटात विजेतेपद पटकाविले होते. मात्र, कोणत्याही वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर करंडक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होय. 

  सविस्तर वाचा »

 • News

  टी-20 मालिका : भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार

   विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

  या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वीस षटकांत आठ बाद 144 असं रोखलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं 19 षटकांत चार बाद 137 धावांची मजल मारली होती.

  इंग्लंडला सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.

  सविस्तर वाचा »

 • News

  साहा, पुजाराच्या खेळीमुळे शेष भारताने इराणी ट्रॉफी जिंकली! रणजी चॅम्पियन गुजरातला 6 विकेटने हरवले

  वृद्धिमान साहाचे (नाबाद २०३) द्विशतक आणि चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद ११६) शतकाच्या बळावर शेष भारताने संघाने दमदार प्रदर्शन करताना इराणी ट्रॉफी जिंकली. साहा, पुजाराने शेष भारत संघाने गुजरातला विकेटने हरवले. गुजरातने शेष भारत संघाला विजयासाठी ३७९ धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. शेष भारत संघाने केवळ ४ विकेट गमावून लक्ष्य गाठले. शेष भारत संघाने २७ वेळा विजय मिळवला. विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहाने प्रथम श्रेणीत पहिले द्विशतक ठोकले, तर चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणीत ३७ वे शतक झळकावले.

  साहाची याआधी सर्वोत्तम कामगिरी नाबाद १७८ अशी होती. या कामगिरीला मागे टाकताना साहाने गुजरातविरुद्ध नाबाद २०३ धावा ठोकल्या. साहाशिवाय कर्णधार चेतेश्वर पुजाराने नाबाद ११६ धावा काढल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ३१६ धावांची भागीदारी केली. मंगळवारी सकाळी शेष भारताने फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा त्यांना विजयासाठी ११३ धावांची गरज होती. वृद्धिमान साहाने धुवाधार फलंदाजी करून दोन तासांतच लक्ष्य गाठले. सोमवारी ८३ धावांवर नाबाद असलेल्या चेतेश्वर पुजाराने शतक झळकावताना त्याला चांगली साथ दिली. पुजाराने पहिल्या डावात ८६ धावा काढल्या होत्या. इराणी टॉफीत द्विशतक ठोकणारा साहा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला. शेष भारताने बाद ६३ धावा अशा संकटमय स्थितीतून विजय मिळवला. साहाने २७२ चेंडूंचा सामना करताना ६ षटकार आणि २६ चौकार मारले, तर पुजाराने २३८ चेंडूंत १६ चौकार मारले. साहाने मंगळवारी ५८ चेंडूंत ८० धावांची आक्रमक खेळी केली.

  * महत्त्वाचे 
  { शेष भारत संघाने तब्बल २७ व्यांदा इराणी ट्रॉफी जिंकली. रणजी विजेत्या संघाने २६ वेळा ही ट्रॉफी आपल्या नावे केली. २ वेळा सामने अनिर्णीत राहिले. 
  { पुजारा आणि साहा यांनी पाचव्या विकेटसाठी ३१५ धावांची नाबाद भागीदारी केली. इराणी ट्राॅफीत ही कोणत्याही विकेटसाठी ठरलेली सर्वोच्च भागीदारी आहे. 
  { इराणी करंडकाच्या चौथ्या डावात द्विशतक ठोकणारा वृद्धिमान साहा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला. 
  { चेतेश्वर पुजारा भारतात प्रथम श्रेणीच्या एका सत्रात दोन वेळा १५०० पेक्षा अधिक धावा काढणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

   

   

  सविस्तर वाचा »

 • News

  चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर कमांडर युजेन सेरननचे निधन

   

  चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान मिळालेले कमांडर युजेन सेरनन (८२) याचे निधन झाले आहे. ह्यूस्टनच्या एका रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. सरनेन यांच्या कुटूंबाची प्रवक्ता मेलिसा रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी अंतराळवीर युजेन सेरनन काही दिवसांपासून आजारी होते. 

  युजेन सेरनन अपोलो 17 या याने कमांडर होते. त्यांनी 14 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर जाणारे ते शेवटचे पृथ्वीवासी होते. तिसऱ्या अंतराळ यात्रेवेळी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. 

  सविस्तर वाचा »

 • News

  अवकाशगंगांची संख्या दोन हजार अब्ज

  विश्‍वामध्ये एकूण दोन हजार अब्ज अवकाशगंगा असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. पूर्वी असलेल्या अंदाजापेक्षा ही संख्या दसपटीने अधिक आहे.

  विश्‍वामधील अवकाशगंगांची संख्या जाणून घेण्यासाठी संशोधक सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील वीस वर्षांपासून यासाठी ते अवकाशात असलेल्या हबल दुर्बिणीचा वापर करत आहेत. या दुर्बिणीद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांचा अभ्यास करून विश्‍वामध्ये शंभर ते दोनशे अब्ज अवकाशगंगा असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ ख्रिस्तोफर कॉन्सेलाइस यांच्या नेतृत्वाखालील गटाने नव्याने अभ्यास करत अवकाशगंगांची संख्या अधिक असल्याचा दावा केला आहे. अवकाशगंगा मोजण्याबाबतचे विश्‍लेषण केल्यावर या गटाने हबलसह इतर सर्व दुर्बिणींमधून मिळणाऱ्या पेन्सिल बीम छायाचित्रांचे त्रिमितीय नकाशात (थ्री डी मॅप) रूपांतर केले. यामुळे अवकाशगंगांची घनता मोजणे शक्‍य झाले, तसेच अवकाश पोकळीला छोट्या छोट्या भागात विभागून प्रत्येकाचा स्वतंत्र अभ्यास करणे शक्‍य झाले. या अत्यंत अवघड आणि किचकट संशोधनानंतर या गटाला आतापर्यंत न मोजल्या गेलेल्या अवकाशगंगांचा शोध घेता आला. त्यांचे हे संशोधन विश्‍वाच्या विविध कालखंडातील अवकाशगंगांच्या निरीक्षणावर आधारलेले आहे. अवकाशगंगांची संख्या मोजता, ती पूर्वीच्या अनुमानापेक्षा जवळपास दहा पटीने अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

  सविस्तर वाचा »

 • News

  ‘फिफा’ वार्षिक पुरस्कारांमध्ये रोनाल्डोची बाजी

  पोर्तुगाल आणि रेआल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने जागतिक फुटबॉल संघटनेच्या (फिफा) वार्षिक पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ३१ वर्षीय रोनाल्डो हा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा लिओनेल मेसी तसेच फ्रान्सच्या अँटाईन ग्रीझमनला मागे टाकले.

  ‘बॅलन डी ऑर’ पुरस्कार पटकावणा-या रोनाल्डोसाठी २०१६ वर्ष चांगले गेले. त्याने १२ सामन्यांत १६ गोल करताना माद्रिदच्या चँपियन्स लीग आणि पोर्तुगालच्या युरो चषक जेतेपदात मोलाचा वाटा उचलला. सवरेत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून लिसेस्टर सिटीच्या क्लॉडिओ रॅनियरी यांना गौरवण्यात आले.

  सविस्तर वाचा »

 • News

  फिफाच्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ‘रोनाल्डो’ सन्मानित

  ख्रिस्तीयानो रोनाल्डोला फिफा संघटनेतर्फे उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते रोनाल्डोने पुरस्कार स्वीकारला.

  रोनाल्डोने बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्ट्राईकर लियोनल मेस्सी आणि एंटोनी ग्रीजमन यांना मागे टाकत या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. रोनाल्डोला एकूण ३४.५४ टक्के मते मिळाली. मेस्सीलला २६.४२ टक्के तर एंटोनीला ७.५३ टक्के मते मिळाली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, की २०१६ हे माझ्या कारकीर्दीतील सर्वोतम ठरले. मला माझ्या कामगिरीबद्दल अनेक शंका होत्या पण ही ट्राफी जिंकल्यानंतर माझ्या शंकाचे समाधान झाले आहे. चाहत्यांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षांवर मी खरे उतरलो आहे. 

  सविस्तर वाचा »

 • News

  पाकिस्तानकडून बाबर-३ची यशस्वी चाचणी

  पाकिस्तानने (9/1/2017) रात्री पाणबुडीवरून सोडता येणार्‍या पहिल्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र बाबर-3ची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राद्वारे 450 कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

  पाकिस्तान इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) दिलेल्या माहितीनुसार, ही यशस्वी चाचणी हिंदी महासागरात एका अज्ञात स्थळी मारा करून करण्यात आली. पाकिस्तान लष्कराचे प्रवयता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी याचा व्हिडिओ आपल्या टि0ट पोस्टवर डाऊनलोड केला आहे. यामध्ये पाण्यातील क्षेपणास्त्रद्वारे जमीनीवर मारा करताना दाखविले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या यशाबद्दल देशवासियांचे आणि लष्कराचे अभिनंदन केले आहे.

  सविस्तर वाचा »

मासिक विजेता

 • Expandable Input

  आशिष म. कुंभारे , नागपूर

  स्कोर : ७५. ५५%       क्रमांक :१

  स्टेट बँक ओंफ इंडिया (पीओ) ऑगस्ट पेपर

 • Expandable Input

  मनोज शर्मा,पुणे

  स्कोर : ७४. ८५% क्रमांक :२

  स्टेट बँक ओंफ इंडिया (पीओ) ऑगस्ट पेपर

 • Expandable Input

  हेमंत ओ. लाडूकर , नागपूर

  स्कोर : ७४. २५%       क्रमांक :3

  स्टेट बँक ओंफ इंडिया (पीओ) ऑगस्ट पेपर

 • Expandable Input
  Rs 15000/-

  मासिक विजेता होण्याकरिता

  येथे क्लिक करा

  पुढील मासिक परीक्षा : Date 25-Septmber-2015
  संयोजक : प्रतिभा क्लासेस नागपूर